[ahmednagar] - छिंदमचे नगरसेवकपद रद्द प्रकरणी मुंबईत सुनावणी

  |   Ahmednagarnews

छिंदमचे नगरसेवक

रद्दप्रकरणी मुंबईत सुनावणी

अंतिम निकालाकडे राज्याचे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नगर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याने महापालिकेतील भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद महापालिका महासभेने रद्द केले असले तरी महासभेच्या या निर्णयावर छिंदमने आक्षेप घेतला आहे. सरकारकडे तक्रार करून आव्हान दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासमोर बुधवारी मुंबईत झाली. या प्रकरणाच्या निकालाकडे नगरसह राज्यभरातील शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.

महापालिका कर्मचाऱ्याशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने श्रीपाद छिंदमचा उपमहापौरपदाचा राजीनामा मंजूर करून त्याचे नगरसेवक पदही रद्द करण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेने मागील फेब्रुवारी महिन्यात केला आहे. या ठरावास छिंदमने आक्षेप घेतला आहे. उपमहापौरपद राजीनामा पत्रावर आपण सही केलेली नाही. या पत्रावरील सही बनावट आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांच्यासह महापालिका प्रशासनावर कारवाईची अशी मागणी त्याने सरकारकडे तक्रारीद्वारे केली आहे. याबाबत सरकारने महापौर कदम व मनपा प्रशासनाकडून म्हणणे मागवले होते. यावर राज्यमंत्री पाटील यांच्यासमोर बुधवारी अंतिम सुनावणी झाली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/zHFSmgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬