[ahmednagar] - मनपालिकेसाठी ‘एमआयएम’ची तयारी

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

दलित-मुस्लिम ऐक्याचा नव्याने नारा देणारा 'एमआयएम' पक्ष नगर महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी करू लागला आहे. यादृष्टीने पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहावर बुधवारी बैठक घेतली. आधी शहरात संघटना बांधणी मजबूत करायची व नंतर पूर्ण ताकदीने महापालिका लढवायची, अशी रणनीती या वेळी निश्चित केली गेल्याचे सांगितले जाते.

शासकीय विश्रामगृहावर पक्ष निरीक्षक आयुब जहागिरदार यांच्या उपस्थितीत नगरमधील समर्थक कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी औरंगाबाद येथील पक्षाचे नेते सरफराज खान, नगरसेवक विकास एडके, इरशाद खान, इसहाक खान यांच्यासह अन्य उपस्थित होते. या वेळी पक्षाच्या नगर शहराध्यक्षपदी सरफराज जहागिरदार व युवक आघाडीच्या अध्यक्षपदी शादाब कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली.

ताकदीने उतरणार

पक्षाचे प्रमुख खासदार असदूद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाज एकवटला असून, औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाने नगर येथे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे आयुब जहागिरदार यांनी या वेळी सांगितले. नगर महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसल्याने येत्या महिनाभरात नगरमध्ये संघटनात्मक बांधणी केली जाणार आहे. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून महापालिका निवडणूक वातावरणाचा आढावा घेतला जाणार आहे. संघटना मजबूत झाल्यानंतर पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, असेही जहागिरदार यांनी स्पष्ट केले. पक्षाचे काम तळागाळातील जनतेपर्यंत पोचल्यामुळे लोकसभा, विधानसभा व अनेक महापालिकांतून पक्षाला संधी मिळाली असल्याने नगरला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/c0kIowAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬