[ahmednagar] - लोहसर खांडगाव येथील मंदिरात दरोडा

  |   Ahmednagarnews

पाच लाखांचा ऐवज लंपास

पाथर्डी : तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील श्री काळ भैरवनाथ मंदिरातील मुर्तीचे चांदीचे मुखवटे व मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी जवळपास पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी (१७ ऑक्टोबर) पहाटे घडली. या घटनेने लोहसर खांडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, 'नवरात्र काळात या मंदिरात भाविकांची रोज मोठी गर्दी होत असते. मंगळवारी सातव्या माळेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा मंदिर बंद करण्यात आले. बुधवारी पहाटे पुजाऱ्याने मंदीर उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. मंदिरातील मूर्तीचे दोन चांदीचे मुखवटे, सोन्याचे डोळे तसेच मंदिरातील दोन दानपेट्या फोडून त्यातील रक्कम चोरीस गेल्याचे आढळून आले. पुजाऱ्याने ग्रामस्थांना कल्पना दिल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने नगरहून श्वान पथकाला पाचारण केले. मात्र, उपयोग झाला नाही. या ठिकाणच्या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, ते सध्या बंद पडले असल्याने चोरट्यांचे फावले. हा दरोडा टाकण्यापूर्वी चोरट्यांनी मंदीर व परिसराची पूर्ण माहिती घेत सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची सुद्धा माहिती घेतली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात शिवनाथ दगडखैर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GQI4YAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬