[ahmednagar] - शिर्डी: PMच्या सभेतून लोकसभा प्रचाराचा बिगुल?
ताराचंद म्हस्के, शिर्डी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा हा साई समाधी शताब्दीच्या सांगता कार्यक्रमासाठी नियोजित असला तरी, राज्यातील सत्तारूढ भाजपनं या दौऱ्याचा राजकीय लाभ घेण्याचं ठरवलेलं दिसतंय. राज्य सरकारने बांधलेल्या २ लाख ४० हजार घरकुलांच्या वाटपाच्या निमित्ताने भव्य जाहीर सभा घेऊन पंतप्रधानांच्या भाषणाद्वारे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकायचे, असा भाजपचा विचार असल्याचं समजतंय. या सभेसाठी भाजपने जय्यत तयारीही केली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी साई समाधी शताब्दी सांगता सोहळा पार पडणार आहे. मात्र, या सोहळ्याद्वारे आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराचे बिगुल वाजवण्याचा निर्धार भाजप नेतृत्वानं केला आहे. याच कार्यक्रमात राज्य सरकारने घरकुल वाटपाचाही कार्यक्रम आयोजित केला आहे. राज्यभरात बांधलेल्या २ लाख ४० हजार घरकुलांपैकी ४० हजार लाभार्थ्यांना या कार्यक्रमात घरकुल वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी नगर, नाशिक, औरंगाबाद, बीड आणि पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सरकारी खर्चाने बोलावण्यात येणार आहे....
फोटो - http://v.duta.us/8ci7-AAA
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kSe20wAA