[ahmednagar] - सृजन देते मुला-मुलींना स्वओळख

  |   Ahmednagarnews

मटा सोशल फेस्टिवल

'सृजन' देतेय विद्यार्थ्यांना स्वओळख

म. टा. प्रतिनिधी, नगर

कौटुंबिक, आर्थिक व अन्य परिस्थिती कशीही असो, आपल्याला सुविधा मिळोत वा न मिळोत... आपण नेमके काय आहोत व काय करू शकतो याची जाणीव, स्वओळख विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात येथील सृजन ग्रुप यशस्वी झाला आहे. अशा स्वओळखीमुळे कस्तुरीमृगासारख्या स्वतःतील अंगभूत कौशल्यांची जाणीव झालेल्या विद्यार्थ्यांमधून एक इंजिनिअर, दोन वकील, एक शिक्षिका, एक कला शिक्षक, दोन अकाउंट ऑफिसर व अनेक छोटे-मोठे व्यावसायिक घडले आहेत. स्वतःतून नवनिर्मिती करणारे हे सृजनत्व विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास देऊन जात आहे.

नामवंत शाळांतील मुला-मुलींना सर्वांगीण शिक्षण मिळत गेल्याने त्यांच्यातील प्रतिभा फुलत जाते. पण गरीब मुला-मुलींसाठीच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे त्यांच्या पालकांचेच लक्ष नसते. त्यांना रोजच्या रोजीरोटीचे पडलेले असते. त्यामुळे या मुलांमध्येही-आपल्याकडून काहीही होऊ शकत नसल्याचा न्यूनगंड निर्माण होतो. अशा मुलांना एकत्रित करून खेळ, गाणी, गोष्टी, कठपुतली, कोडी सोडवणे, नाटक बसवणे, लिखाण करणे, व्यक्त होण्यासारख्या उपक्रमांतून स्वतःतील कलागुण व क्षमता शोधण्यास प्रोत्साहन दिले जाते. यातून हजारो मुला-मुलींचे जीवन आमूलाग्र बदलले गेले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/L2wJJwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬