[ahmednagar] - सावित्री बुक बँकेची स्थापना

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेने सावित्री बुक बँकेची स्थापना नगरमधील रहेमत सुलतान सभागृहामध्ये बुधवारी केली. या बुक बँकेच्या गावोगावी दोनशे शाखा सुरू करण्यात येणार असून तेथून गरीब विद्यार्थ्यांना अवघ्या दहा रुपयात पाच वह्या देण्यात येणार आहेत.

स्मायलिंग अस्मिता विद्यार्थी संघटनेचा बुधवारी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त ही बुक बँक सुरू करण्यात आली. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, भैरवनाथ वाकळे, वसंतराव कापरे, शिल्पकार विकास कांबळे, अभिजित वाघ, कुमार नवले, सिनेट सदस्य बाळासाहेब सागडे प्रा.संजय जाजगे, अजय आगवान उपस्थित होते.

'देश घडवण्यासाठी उच्चशिक्षित लोकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे,' असे यावेळी मार्गदर्शन करताना नंदकुमार झावरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, 'उच्चशिक्षित तरुणांनी मिळेल त्या संधीचे सोने केले पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो, यासाठी थोडा वेळ काढून समाजकार्यामध्ये तरुणांनी सहभागी व्हावे,' असे आवाहनही त्यांनी केले. झावरे यांना त्यांच्याच जीवनपटाचे शिल्प भेट म्हणून देण्यात आले. माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी विद्यार्थी संघटनेने सुरू केलेल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, 'स्मायलिंग अस्मितेचे काम अतिशय सरळ व स्पष्ट दृष्टीकोन असलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सावित्री बुक बँक अतिशय महत्त्वाची बाब ठरेल,' असे सांगितले. संघटनेचे राज्य समन्वयक यशवंत तोडमल यांनी दहाव्या वर्धापनदिनी सुरू केलेल्या सावित्री बुक बँकेची उद्दिष्टे सांगितले. सूत्रसंचालन प्रकाश गायकवाड व शुभम झावरे यांनी केले. तर सागर घोरपडे यांनी आभार मानले. गायत्री शेवाळे, पूजा आढाव, विनीत गाडे, शुभम पांडुळे, संभाजी कदम, ऋषिकेश दुसंग, संदीप सायंबर, विशाल म्हस्के, आमिन पठाण, आकाश वाघ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4aHMFAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬