[aurangabad-maharashtra] - फुलंब्रीत तिहेरी अपघातात नऊ जखमी

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

औरंगाबाद - जळगाव महामार्गावर कार, क्रुझर व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून, सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी (१६ ऑक्टोबर ) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. वनिता उमेश सुरडकर व संतोष नलावडे अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहे. या अपघाताची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद - जळगाव महामार्गावरून मंगळवारी साडेपाचच्या सुमारास कार (क्रमांक एमएच ४३, एएल ०४५९) फुलंब्रीकडून औरंगाबादच्या दिशेने चालली होती. कारचे समोरील टायर फुटल्याने कार चालकांनी प्रसंगावधान साधून कार नियंत्रणात आणली, परंतु कार नियंत्रणात आणल्यावर ती विरुद्ध दिशेला कार जाऊन उभी राहिली. त्याचवेळी क्रुझर (क्रमांक एमएच ०४ सीजी ७८६८) समोरून येणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रुझर गाडी रस्त्याच्या चार - पाच फूट झाली जाऊन कोसळली. त्याचवेळी औरंगाबादहून फुलंब्रीच्या दिशेला येणारी शाईन (क्रमांक एमएच २० ईपी ७९८१) ही दुचाकीसुद्धा रस्त्याच्या चार-पाच फूट खाली कोसळली. या तिहेरी अपघातात वनिता उमेश सुरडकर (नवजीवन कॉलनी, औरंगाबाद) व संतोष नलावडे (रा. दरेगाव, बाजारसावंगी, ता. खुलताबाद) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. वैशाली प्रदीप पाटील, अक्षय प्रदीप पाटील,(दोघेही रा. पुणे), गीता अरुणकुमार अवस्थी (रा. लखनऊ), उमेश मनोहर सुरडकर, वैष्णवी उमेश सुरडकर, श्रावणी उमेश सुरडकर (सर्व रा. नवजीवन कॉलनी, औरंगाबाद), लक्ष्मण खुटे (रा. दरेगाव, बाजारसावंगी, ता. खुलताबाद) यांच्यासह आदी जखमी झाले होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/sOyDkAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬