[aurangabad-maharashtra] - बेकायदा उत्‍खननावर छापे

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले असून, बुधवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी धडक मोहीम राबवत बाळापूर शिवारात दगडी खदाणींमधून अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पथकाने चार जेसीबीसह दोन ट्रक, दोन टॅक्‍टर जप्त केले.

गेल्यावर्षीपासून जिल्ह्यात वाळूपट्ट्यांच्या कंत्राटासह खदानींची व्यवस्थाही बिघडली आहे. खदानींमधून बिनदिक्कतपने गौण खनिजाची तस्करी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद केवळ वाळूवरच लक्ष केंद्रित करीत असून, शहर परिसरातील डोंगर कापण्याच्या कामाकडे डोळेझाक करण्यात येते. ही बाब सातत्याने जिल्हा प्रशासनासमोर आल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार औरंगाबाद तालुक्‍याचे अपर तहसीलदार रमेश मुनलोड यांच्या पथकातील केशक डकले, योगेश पंडित, आशिष पुपले, दिनेश हापत, विजय भंडारे, संजय आधाने, किशोर जाधव, गोपीनाथ जयवळ, अविनाश जाधव यांनी बाळापूर गट क्रमांक ७१मधील गायरान जमिनीमध्ये असलेल्या दगड खदानींवर छापा मारला व वाहने जप्त केली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5Vr0UwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬