[aurangabad-maharashtra] - 'मराठा आरक्षणासाठी सेनेनं सत्ता का सोडली नाही?'

  |   Aurangabad-Maharashtranews

औरंगाबाद:

'मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेने सत्तेला लाथ मारण्याची भूमिका घ्यायला हवी होती. पण शिवसेनेनं तसं केलं नाही, कारण त्यांना सत्ता प्रिय होती,' असा आरोप कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला.

मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हाच त्यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे संकेत दिले होते. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली. वाकी संस्थानचे सुखदेव महाराज यांच्या हस्ते त्यांच्या पक्षाच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी जाधव बोलत होते. शिवसेनेवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. 'पक्षशिस्तीच्या नावाखाली शिवसेनेचं वाटोळं होत आलं आहे. शिवसेनेत हुजरेगिरी करणाऱ्यांनाच महत्त्व आहे,' असं ते म्हणाले. खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. 'खैरे यांनी औरंगाबादमध्ये हिंदुत्वाचा बाजार मांडला आहे. खासदारकी टिकवण्यासाठी त्यांनी दंगल घडवली आहे,' असा आरोपही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांनी अद्याप हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही.

फोटो - http://v.duta.us/yXHgCQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/HSsHuAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬