[mumbai] - उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार
मुंबई :
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती शब्दांत हल्लाबोल केला. राज्यावरील दुष्काळाचं सावट, पेट्रोल-डिझेलचे भडकलेले दर, राज्य आणि केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा कारभार आणि राम मंदिर अशा धगधगत्या मुद्द्यांवरून उद्धव यांनी निशाणा साधला.
शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा हा एक विचारांचं सोनं पेरणारा सणच बनला आहे. यंदाचे मेळाव्याचे ५२वे वर्ष आहे. याचा संदर्भ देत उद्धव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. शिवसेनेचे स्थानिक विभागप्रमुख सदा सरवणकर यांनी उद्धव यांना श्रीरामाची मूर्ती भेट दिली. तो धागा पकडून रावणदहनाकडे बोट दाखवत भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव यांनी राम मंदिरावरून भाजपला टोला हाणला. दरवर्षी देशात रावण उभा राहतो पण राम मंदिर काही उभे राहत नाही, असे उद्धव म्हणाले....
फोटो - http://v.duta.us/XJA_OwAA
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/VQVelQAA