[mumbai] - ‘जेव्हीएलआर’वरून काँग्रेस-सेनेत जुंपणार
मुंबई:
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडला (जेव्हीएलआर) काँग्रेसचे दिवंगत नेते गुरूदास कामत यांचे नाव देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने गटनेत्यांच्या बैठकीत ठेवला आहे. मात्र या रस्त्याला १० वर्षांपूर्वीच संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. या नामकरणावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
पश्चिम व पूर्व उपनगरला जोणाऱ्या 'जेव्हीएलआर'ला गुरूदास कामत यांचे नाव देण्याचे पत्र विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पाठवले आहे. काँग्रेस आमदार जनार्दन चांदूरकर यांच्या मागणीनुसार राजा यांनी कामत यांच्या नावासाठी आग्रह धरला आहे. विद्यार्थी चळवळीपासून कामत राजकारणात आहेत. मुंबई काँग्रेसचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले असून मुंबईतून पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. केंद्रामध्ये राज्यमंत्री पदावर राहिलेल्या कामत यांच्या लोकहिताच्या कामाची दखल घेऊन त्यांचे नाव 'जेव्हीएलआर'ला देण्यात यावे. असा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत ठेवण्यात यावा, अशी विनंती राजा यांनी केली आहे....
फोटो - http://v.duta.us/cj49YwAA
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UT5u8gAA