[mumbai] - मुंबईतील रुग्णालयाचा प्रताप; रुग्णाला मॅन्युअल व्हेंटिलेटरवर ठेवलं

  |   Mumbainews

मुंबई:

एका गंभीर जखमी पेशंटला सायनच्या शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्यामुळे म्हणून मॅन्युअल व्हेंटिलेटरच्या साहाय्याने तब्बल आठ तास जिवंत ठेवण्याची नामुष्की कुटुंबियावर ओढवली . आठ तासांनंतरही एका पत्रकाराने विनवण्या केल्यामुळे सायन हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने या रुग्णाला व्हेंटिलेटर मिळवून दिले.

शकील अहमद (४०) हे वाशी नाका परिसराचे रहिवाशी असून मंगळवारी त्यांना मानखुर्द परिसरात एका ऑटो रिक्शाने धडक दिली होती. शकील अहमद यांना तातडीने मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारासाठी लागणारी कोणतीच उपकरणं आणि सुविधा गोवंडी रुग्णालयात नसल्याने त्यांना सायनच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. तोपर्यंत अहमद यांच्या डोक्यातून बराच रक्तस्त्राव झाला होता तसंच त्यांना श्वसनाचा त्रासही होत होता. तेव्हा डॉक्टरांनी त्यांचे ऑपरेशन करून श्वसनासाठी एक कृत्रिम नळी बसवली. ही नळी व्हेंटिलेटरला जोडली होती ज्यामुळे अहमद यांना श्वास घेता येत होता. पण एकाएकी हे व्हेंटिलेटर बंद पडले. तेव्हा रुग्णालयातील बाकी ११ही व्हेंटिलेटर वापरात असून नवीन व्हेंटिलेटर येईपर्यंत तुम्ही मानवी व्हेंटिलेटरचा वापर करा असा सल्ला रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांना दिला. श्वसनासाठी एक अम्बू बॅग देण्यात आली. तिच्यात हवा भरण्यासाठी एक पंपही देण्यात आला. या पंपाच्या साहाय्याने अंबू बॅगमध्ये हवा भरून रुग्णाला श्वास घ्यायला मदत करता येते. तेव्हा तब्बल आठ तास अहमदच्या कुटुंबियांनी ही अंबू बॅग पंप केली. १५-२० मिनिटांनी प्रत्येक जण आळीपाळीने ही अंबू बॅग पंप करत होता. जर मध्येच पंप करणं बंद केलं असतं किंवा अंबू बॅगमध्ये काही बिघाड झाला असता तर शकील अहमद यांच्या मृत्यूचाही धोका होता....

फोटो - http://v.duta.us/ZpVjMAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/QT-bqQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬