[mumbai] - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मोदींविरोधी घोषणा

  |   Mumbainews

मुंबई :

दादर येथील शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांची अलोट गर्दी उसळली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेत्यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. या भाषणांतून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आला.

शिवसैनिकांच्या गर्दीतून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या जात आहेत. शिवसेना नेते व राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राफेलवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी 'जय श्रीराम'चा नारा दिला तर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा घणाघात केला.

राज्यातील आणि देशातील जनता एकदा मुर्ख बनली. मात्र, आता लोकांना कळून चुकले आहे. हे फेकाफेकी करणाऱ्यांचे सरकार २०१९ मध्ये आपल्याला घालवायचे आहे, असे यावेळी संजय राऊत म्हणाले. उद्धव यांच्या सूचनेवरून राऊत यांनी नुकताच अयोध्या दौरा केला. त्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, अवघी अयोध्या नगरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वाट पाहत आहे. शिवसेनाच राम मंदिर बांधेल, अशी आशा तेथील साधू-संतांना आहे. हा विश्वास शिवसेना सार्थ ठरवणार, असेही राऊत म्हणाले.

फोटो - http://v.duta.us/rCKDjQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_PqSHAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬