[nagpur] - अजित पवारांबाबत महिन्याभरात निर्णय घ्या

  |   Nagpurnews

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

सिंचन घोटाळयातील सहभागाबाबत अजित पवार यांच्याविरोधात लाचलुचपत विभाग करत असलेल्या संथ कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याबाबत 'रूल्स ऑफ बिझनेस' अंतर्गत सिंचन विभागाच्या सचिवांचे अभिमत प्राप्त झाले आहे. या अभिमतावर लाचलुचपत विभागाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. एक महिन्याच्या आत त्या अभिमतावर पुढील कारवाईचा निर्णय घ्या,' असे आदेश न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने दिले.

विदर्भातील सिंचन घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करऋण्यात यावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका 'जनमंच' संस्थेने तर जीगाव, निम्नपेढी, रायगडी व वाघाडी या चार प्रकल्पांचे कंत्राट माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या कंपनीला अजित पवार यांनी राजकीय लाभातून दिल्याचा आरोप करणारी जनहित याचिका अतुल जगताप यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकांवर बुधवारी न्या. धर्माधिकारी आणि न्या. मोडक यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने हे आदेश दिले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pxSwewAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬