[nagpur] - क्लबच्या गैरप्रकारांबाबत अहवाल द्या

  |   Nagpurnews

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

नझूल जमिनीचा अवैधरित्या व्यावसायिक वापर करणाऱ्या १२ क्लब, संस्था व संघटनांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला त्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

कस्तूरचंद पार्क मैदानाचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या वृत्ताची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली होती. त्यात 'न्यायालय मित्र' म्हणून अॅड. श्रीरंग भांडारकर यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी कस्तूरचंद पार्कसह शहरातील इतरही नझुलच्या जागांचा गैरवापर होत असल्याचा दावा केला होता. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत पाहणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील ११३ नझुलच्या जागांची पाहणी केली. त्यात १२ जागांचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. नझुलच्या भाडेपट्टी तत्त्वानुसार केवळ शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व मनोरंजनासाठीच त्या जागांचा वापर करणे बंधनकारक आहे. त्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्यास त्यातून होणाऱ्या उत्पन्नाच्या २५ टक्के रक्कम सरकार जमा करण्याचे बंधन आहे. परंतु, विदर्भ साहित्य संघ, सी.पी. क्लब, लेडीज क्लब, वायएमसीए, व्हीसीए, ऑफिसर्स क्लब, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, भगिनी मंडळ, चरखा संघ, युनायटेड फ्रेंच ट्रस्ट, आंध्र असोसिएशन, जवाहर विद्यार्थी गृह या संस्थांनी भाडेपट्टी नियमांचे उल्लंघन करून जागेचा व्यावसायिक वापर केला असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/B8T3nAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬