[nagpur] - ठार माओवादी टिपागडचा दलम कमांडर

  |   Nagpurnews

म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली

जिल्ह्यात मंगळवारी चकमकीत ठार झालेल्या मृत माओवादी हा टिपागड दलम कमांडर पंकज दुग्गा असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. उत्तर गडचिरोलीत मागील सात वर्षांत झालेल्या हिंसक घटनामध्ये पंकजचा सहभाग होता. पंकज चकमकीत ठार झाल्याने उत्तर गडचिरोलीत माओवादी चळवळीला धक्का बसला आहे.

कुरखेडा तालुक्यात माओवाद्यांचे लोकेशन असल्याची माहिती मिळाल्याने या भागात अभियान राबविण्याचा निर्णय ऑपरेशन सेलने घेतला. सी-सिक्स्टी हे माओवादविरोधी विशेष अभियान पथकाचे जवान या भागात पाठविण्यात आले. या पथकाला कोंबडपारच्या पहाडावर माओवाद्यांचे कॅम्प असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पहाड परिसरात पथक असताना धूर दिसून आला. माओवाद्यांचे कॅम्प असल्याचे स्पष्ट झाल्याने पहाडावर पथकाने चढाई सुरू केली. सकाळी ११ वाजता पथक पोहचताच माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनीही प्रत्युत्तर दिले. काही वेळ चकमक थांबली. हीच संधी साधून सी-सिक्स्टी कमांडो पथकाने रणनिती तयार करून घेराबंदी केली. अर्ध्या तासानंतर परत गोळीबार करत माओवादी पळू लागल्याने जवानांनीही गोळीबार सुरू केला. यात एक माओवादी ठार झाला. रात्री मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोलीत आणल्यानंतर त्याची ओळख पटली. हा टिपागड दलमचा कमांडर पकंज दुग्गा असल्याचे स्पष्ट झाले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/y0aLHAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬