[nagpur] - दिवसाला तयार होतात सहा सेगमेंट

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

मेट्रो रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाइन आता जवळ येत आहे. डेडलाइनच्या आता काम करण्यासाठी मेट्रोच्या कास्टिंग यार्डमध्ये चांगलीच धावपळ सुरू असून दिवसाला ६ सेगमेंट तयार केले जात आहे.

महामेट्रोच्या जामठा कास्टिंग यार्ड येथे सेगमेंट तयार करण्याचे काम पूर्ण झाले. नागपूर ग्रामीण क्षेत्रात येणाऱ्या आसोली कास्टिंग यार्ड येथे २ हजार ३७८ सेगमेंट तयार केले जात असून त्यापैकी १ हजार १५२ सेगमेंट तयार करण्यात आले आहे. १९ एकरमध्ये पसरलेल्या या कार्टिंग यार्डमध्ये आता युद्दपातळीवर काम सुरू आहे.

सेगमेंट, आय गर्डर व टी गर्डर तयार करण्याच्या कामात मेट्रोचे अधिकारी, अभियंते आणि २६० कर्मचारी गुंतले आहेत. दिवसाला सहा सेगमेंट तयार केले जातात. मुंजे चौक इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन पर्यंत ८.३ किमीच्या मार्गावर एकूण ९ स्टेशन उभारण्यात येत आहे. बजरीया, मोमीनपुरा, इतवारी व महल सारख्या या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक प्रतिष्ठान व रहिवासी क्षेत्र आहेत. या गर्दीच्या ठिकाणी आता मेट्रोचे काम सुरू झाले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4WpS6wAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬