[nagpur] - रावणदहन बंद करा; विद्रोही चळवळीची मागणी

  |   Nagpurnews

नागपूर:

आदिवासी राजा रावण यांच्या दहनाची कुप्रथा तातडीने बंद करण्याची मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीने केली आहे.

कष्ट करून जगणाऱ्या बहुजनांच्या श्रमण संस्कृतीवर ब्राह्मणी संस्कृतीने कपट नीतीने हल्ले करून नष्ट करण्याचे आटोकाट प्रयत्न केले आहेत. वर्ण, जात, धर्म, पुरुषसत्ताक विचार लादून शुद्र, अतिशुद्र, स्त्रिया यांना गुलामगिरीत ढकलले गेले. दारू पिणे, जुगार खेळणे, कपट कारस्थान करणे, महिलांना माणूसपण नाकारणे, नियोजनपूर्वक हिंसा घडवणे, यज्ञाच्या नावार गायी मारून खाणे हे सर्व गुण देव संस्कृतीचे आहेत. यातील एकही गुण राक्षस संस्कृतीत नव्हता. तरीही राक्षस संस्कृती बदनाम करून रावणाचे दहन करणे हे सांस्कृतिक कपट कारस्थान असल्याचे विद्रोही चळवळीचे अध्यक्ष प्रसेनजित गायकवाड यांनी म्हटले आहे.

रामायण आणि पुराणांमध्ये कुठेही रावणाचे चरित्र वाईट अर्थाने नोंदविलेले नाही. उलट ज्ञानी, संस्कृत पंडित, बलवान, न्यायी राजा असाच रावणाचा उल्लेख आढळतो. त्यामुळेच देशात काही ठिकाणी रावणाची मंदिरे आहेत व आदिवासी समाज रावणाला आपला मोठा भाऊ मानतो. रावणदहन करणे म्हणजे बहुजन समाजाची भावना दुखावणे आहे. त्यामुळे ही प्रथा तातडीने बंद करावी व रावण दहन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

फोटो - http://v.duta.us/sgRMzAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2o_kGwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬