[nagpur] - संघ करणार प्रतीकात्मक शस्त्रपूजन

  |   Nagpurnews

नागपूर:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवातील शस्त्रपूजनावरून वादंग तयार झाला असला तरी कोणत्याही परिस्थितीत पारंपारिक शस्त्रांचे पूजन करण्याचा निश्चय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संघाच्या गणवेशाचा भाग असलेल्या काठीसह भाला, तलवार अशा पारंपारिक शस्त्रांचे पूजनही गुरुवारच्या विजयादशमी उत्सवात होणार आहे. शस्त्रपूजन हा हिंदू धर्माचा भाग असल्याने संघाच्या उत्सवात ते करण्यात काहीही गैर नसल्याचे मत संघाकडून व्यक्त करण्यात येते आहे. शस्त्र प्रतिबंधक कायद्यात पारंपारिक शस्त्रांचा समावेश नसल्याने संघाच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात आक्षेपार्ह काहीही नसल्याचे मत विधिज्ञांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे शस्त्र बाळगण्याची परवानगी नसताना विजयादशमी उत्सवात शस्त्रांचे पूजन आणि प्रदर्शन केले जाते. या पूजनाला परवानगी नाकारण्यात यावी, अशी याचिका मोहनीश जबलापुरे यांनी दाखल केली होती. आरपीआय नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील या मुद्द्यावरून संघाला टीकेचे लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी उत्सवात संघ शस्त्रपूजन करणार किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, विजयादशमी उत्सवाच्या पत्रिकेत दरवर्षीप्रमाणे शस्त्रपूजन शब्दाचा उल्लेख नसल्याने संघाने शस्त्रे म्यान केल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, संघाच्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात हे नाकारले असून शस्त्रपूजन होणारच असल्याचे सांगितले....

फोटो - http://v.duta.us/wGuHbgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/D6YFqAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬