[nagpur] - हा माझा नाही शेकडो वंचित,शोषित मुलांचा सन्मान

  |   Nagpurnews

नागपूर:

'तुम्ही मला इथे बोलवलं हा माझा नाही तर जगातील शेकडो वंचित, शोषित मुलांचा सन्मान आहे' अशी भावना शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांनी संघाच्या व्यासपीठावरून व व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात त्यांना प्रमुथ अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमणे संघाने दसरा उत्सवाचे नागपुरात आयोजन केले आहे. दसरा हा संघाचा स्थापना दिवसदेखील आहे. या ९३व्या स्थापना दिवस सोहळ्यात मध्य प्रदेशमधील सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहे.

कैलाश सत्यार्थी यांनी वंचित, शोषित मुलांसाठी केलेल्या कामासाठी २०१४मध्ये त्यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल सत्यार्थी यांनी संघाचे आभारही मानले आहे. तसंच संघाने दिलेलं प्रेम वंचित शोषित मुलांपर्यंत मी पोचवेन असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली आहे.

फोटो - http://v.duta.us/rGauMgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0V0L-gAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬