[nagpur] - Mohan Bhagwat: राममंदिरासाठी मोदी सरकारनं कायदा करावा!

  |   Nagpurnews

नागपूर:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केलं. राजकारणामुळं राम मंदिर उभारणीचा मुद्दा लांबणीवर पडला, असं ते म्हणाले. राम मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारनं कायदा करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

मोहन भागवत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नानक यांच्या शिकवणीचा उल्लेख करत, भारतीय लष्कर आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचं म्हटलं. 'एससी-एसटी' समाजातील वंचित घटक, पीडितांना आणखी सक्षम करण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं. शहरी नक्षलवादाच्या संकल्पनेवरही त्यांनी भाष्य केलं. देशभरातील छोट्या-मोठ्या आंदोलनांमध्ये भारताचे तुकडे होणार म्हणणारे लोक दिसले. सोशल मीडियावर त्याचा जोरदार प्रचार केला जात आहे. त्यासाठीचा मजकूर पाकिस्तान, इटली, अमेरिकेतून पुरवला जातो, असंही ते म्हणाले. समाजात निर्माण झालेला असंतोष दूर करायला हवा. दबलेल्या-पिचलेल्या लोकांना त्यांचे अधिकार द्यायला पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिला....

फोटो - http://v.duta.us/obulJgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/8yKNrAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬