[navi-mumbai] - आता मुहूर्त दिवाळीनंतरचा

  |   Navi-Mumbainews

मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठीचे मुर्हूत टळत असून आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून यात शिवसेनेला काही महत्त्वाची खाती देण्यात येऊन त्यांची नाराजी दूर करण्यात येणार आहे.

पितृपक्ष असल्याने गणपती उत्सावानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार घटस्थापनेनंतर करण्याचा मुहूर्त भाजपने काढला होता. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची चर्चा झाली. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर तातडीने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे योजले होते. मंगळवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत आले होते. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1TRRHAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬