[navi-mumbai] - गृहस्थी लेखक हरपले

  |   Navi-Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांना सन २०११चा राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यांनी विपुल कथालेखन केले. शांताराम यांनी कथांमधून वेगवेगळे विषय हाताळले. त्यांच्या लेखनामध्ये स्थिरता होती. तसेच ते गृहस्थी लेखक म्हणून मानले जायचे.

अंधारवाट, आठवणींचा पार, उद्विग्न सरोवर, काय गाववाले, चंद्र माझा सखा, चेटूक, छळ आणि इतर गोष्टी, जमिनीवरची माणसं, ठेवणीतल्या चीजा, धर्म, मनमोर, रेलाँ रेलाँ, लाटा, शांताराम कथा, शिरवा, संत्र्यांचा बाग, संध्याराग, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे (अनुवाद) आदी पुरोहित यांची साहित्य संपदा आहे.

आमचा आणि पुरोहित यांचा दीर्घ काळचा स्नेह होता. चार पिढ्यांचा स्नेह आहे हा. पुस्तकप्रेम हा आम्हाला जोडणारा धागा होता. त्यांनी खूप कसदार लिहिले. स्वभावाने अतिशय उमदा असा हा कथाकार होता. ते कायम आनंदी असायचे. त्यांच्यामधील माणूस हा नेहमी मोहवायचा. ते कुटुंबवत्सल तर होतेच, पण ते इतर माणसांमध्येही रमायचे. एक मोठा कथाकार आपल्यातून गेला आहे. - विजया राजाध्यक्ष

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/SwXZGQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬