[pune] - पाण्याअभावी परदेशी विद्यार्थ्यांचे हाल

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणात राज्यात क्रमांक एक, तर देशात नवव्या क्रमांकाचा डंका पिटणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतिगृहात राहणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांसोबतच परदेशी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासोबतच दैनंदिन वापरासाठीचे पाणी मिळवण्यासाठीही झगडावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असून, बुधवारी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात पाणी नव्हते. त्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. अशीच काहीशी परिस्थिती आंतरराष्ट्रीय मुलांच्या वसतिगृहात आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसोबतच सेवक चाळीत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग व कार्यालयांसोबतच वसतिगृहांमध्ये पाणी वाटपाचे योग्य नियोजन नसल्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात नेहमीच पाणीटंचाई उद्भवते. अशातच काही दिवसांपासून महापालिकेकडून विद्यापीठाला दररोज देण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली आहे. सध्या विद्यापीठाला नियमित पाणीपुरवठ्याच्या केवळ २० टक्के पाणीपुरवठा होत आहे. याची झळ वसतिगृहात राहणारे विद्यार्थी, प्राध्यापक आणि सेवक, शाळेतील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना पोहोचत आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, तोदेखील अपुरा असल्याने विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामे करण्यात अडचणी येत आहेत. वसतिगृहे, कार्यालय, शैक्षणिक विभाग, सेवकचाळीला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, त्या दृष्टीने कोणतीच ठोस उपाययोजना आखण्यात येत नसल्याची तक्रार विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/cjWiZgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬