[pune] - ‘भारतीय कला प्रसारिणी’चेविश्वस्त मंडळ बरखास्त

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध कारणास्तव वादग्रस्त ठरलेल्या भारतीय कला प्रसारिणी सभा संस्थेचे विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त झाले. व्यवस्थापनातील अनियमितता, विश्वस्तांमधील वाद, लेखापरीक्षण अहवाल सादर न करणे यांसारख्या कारणास्तव धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी हे आदेश दिले.

भारतीय कला प्रसारिणी सभेच्या विश्वस्त मंडळाला २००५ पर्यंत मुदत होती. त्यानंतरही ते बेकायदा पद्धतीने घटनेच्या विरोधात काम करत होते. मालमत्तेसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताविरोधात विश्वस्त सातत्याने काम करत होते. विश्वस्तांमधील दोन्ही गट आपआपसात वादविवाद करत होते. त्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले. २००५ नंतर विश्वस्तांना धर्मादाय आयुक्तांची मान्यता नसतानासुद्धा भालचंद्र पाठक यांच्यासह अन्य विश्वस्तांनी बेकायदा कारभार केला. या संदर्भात राजेंद्र बलकवडे यांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे तक्रार दाखल केली होती. बलकवडे यांच्या वतीने अॅड. यशवंत पवार यांनी गेल्या १४ वर्षांपासून खटल्याची जबाबदारी सांभाळली होती. या खटल्याचा बुधवारी निकाल देण्यात आला. अखिल भारतीय कला प्रसारिणी सभा संस्थेचे टिळक रस्त्यावरील अभिनव कला महाविद्यालय; तसेच पाषाण येथे आर्किटेक्चर कॉलेज आहे; त्याशिवाय सुमारे शंभराहून अधिक एकर एवढी जमीनदेखील संस्थेची आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/xCtubAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬