[pune] - यशवंतरावांचा वारसा पी. डीं.नी चालवला

  |   Punenews

म. टा. वृत्तसेवा, कराड

'कृष्णा-कोयनेच्या अतूट नात्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या भूमीशी कराडचे नाते आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे थोर व्यक्तिमत्व राज्यासह देशाला कराडने दिले आहे. त्यांचे आचार-विचार राजकारणासह समाजाला दिशा देणारे असून, त्या विचारांची जोपासना करून त्यांचा वारसा पुढे चालवण्याचे काम आदरणीय पी. डी. पाटील साहेबांनी केले आहे,' असे गौरवोद्गार ख्यातनाम नाट्य व सिने दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी बुधवारी काढले.

आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. जब्बार पटेल यांना 'पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०१८' बुधवारी प्रदान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, प्रकाश पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, प्रतिष्ठानचे विश्वस्त अॅड. मानसिंगराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, पं. स. सदस्य रमेश चव्हाण उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे हे आठवे वर्ष असून, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा हा राज्यस्तरीय पुरस्कार असून, मानपत्र, स्मृतीचिन्ह व ५१ हजार रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मागील वर्षी हा पुरस्कार गडचिरोली येथील 'सर्च' संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग यांना देण्यात आला होता....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/21HnoAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬