[pune] - विजयादशमीचा मुहूर्त साधण्याची लगबग
पुणे:
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमीचा मुहूर्त खरेदीसाठी शुभ मानला जात असल्याने गुरुवारी सकाळपासून नागरिकांनी खरेदीचे नियोजन केले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, सोने खरेदीसह अगदी घर बुकिंगसाठी अनेकांनी मुहूर्त निश्चित केला आहे.
दिवाळीच्या वातावरणाची सुरुवात खऱ्या अर्थाने दसऱ्याच्या मुहूर्तावर होते. नवरात्र सुरू झाले की नागरिकांना दिवाळीचे वेध लागतात. दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होत असल्याने लग्न खरेदीची सुरुवात देखील दसऱ्यालाच केली जाते. यंदाही चांगल्या कामांचा प्रारंभ करायचा असेल, तर गुरुवारी दुपारी २.२० ते ३.७ या दरम्यान विजय मुहूर्त आहे, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.
नवरात्रीला सुरुवात झाल्यापासूनच या वर्षी ऑनलाइन शॉपिंग साइटनी अनेक आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या. मध्यवर्ती पुण्यातील आणि उपनगरातील बाजारपेठामधील दुकानेही दसऱ्यानिमित्त सजविण्यात आली आहेत. दसऱ्याच्या तयारीसाठी बुधवारी सकाळपासूनच मध्यवर्ती पुण्यातील महात्मा फुले मंडई, मार्केट यार्ड, गुलटेकडी या भागातील बाजारपेठा फुलांनी बहरल्या होत्या. उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा ठिकठिकाणी पथारीवाले झेंडूच्या फुलांच्या माळा घेऊन बसले होते. संध्याकाळनंतर बाजारपेठांमधील गर्दी वाढली. देवपूजा आणि वाहनांच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी झाली....
फोटो - http://v.duta.us/fqDHqAAA
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/8nrQlwAA