[solapur] - विठुराया बनला गुराखी तर रुक्मिणी विजयलक्ष्मीच्या रूपात
पंढरपूर :
दसऱ्याच्या मुहूर्तावर विठुरायाला पारंपरिक पद्धतीने गुराख्याच्या पोशाखात सजविण्यात आले आहे तर रुक्मिणी मातेची नखशिखांत सोन्याने मढविलेल्या विजयलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे.
विठ्ठलाला आज सोन्याचे धोतर, खांद्यावर खास रेशमी घोंगडी, डोक्यावर सोन्याची पगडी आणि हातात चांदीची काठी असे अनोखे रूप देण्यात आले होते. रुक्मिणी मातेला आज दसऱ्याच्या दिवशी सोन्याची साडी आणि नखशिखांत सोन्याच्या दागिन्याने मढविण्यात आले होते.
गेले नऊ दिवस सुरु असलेल्या नवरात्र महोत्सवात रोज विठुराया आणि रुक्मिणी मातेला विविध पोशाखात नटविण्यात येत होते. आज दसऱ्याला अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविलेले देवाचे हे रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी विठ्ठल मंदिरात गर्दी केली. आजच्या दिवशी विठुरायाच्या दर्शनाने पुढील संपूर्ण वर्ष भरभराटीचे आणि सुख शांतीचे जाते अशी भाविकांची भावना असते....
फोटो - http://v.duta.us/aSXXVQAA
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ZZ56JgAA