[beed] - कारखान्यांनी विकली साखर

  |   Beednews

पावणे पाच लाख टन साखर शिल्लक

म. टा. प्रतिनिधी, नगर

गेल्या गाळप हंगामातील सुमारे ७५ टक्के साखर कारखान्यांनी विकलेली आहे. तर नगर व नाशिक जिल्ह्यांतील कारखान्यांकडे पावणे पाच टन साखर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. दिवाळी असल्याने शिल्लक साखरेला बाजारात मागणी असल्य़ाने साखर विक्री होत आहे. त्यामुळे शिल्लक साखरेचा प्रश्न निर्माण होणार नाही. येत्या काही दिवसांत कारखाने सुरू होणार असून, नवीन साखरही बाजारात येणार आहे. परंतु, यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने साखर उत्पादनाला फटका बसणार आहे.

नगर व नाशिक जिल्ह्यांतील कारखान्यांनी विक्रमी साखर उत्पादन केले होते. दोन्ही जिल्ह्यांतून तब्बल सोळा लाख ३३ हजार टन साखरनिर्मिती केली होती. त्यात नगर जिल्ह्यातील खासगी व सहकारी कारखान्यांनी १५ लाख टन साखर उत्पादन केले होते. साखर उत्पादन वाढल्याने साखरेचे भाव हे २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आले होते. भाव गडगडल्याने कारखान्यांना ऊस उत्पादकांना वेळेत पैसे देता आलेले नाहीत. सप्टेंबरअखेर कारखान्यांनी १२ लाख ८० हजार टन साखर विक्री केलेली आहे. उत्पादन केलेल्या साखरेपैकी ७५ टक्के साखरविक्री झाली आहे. तर सुमारे २५ टक्के म्हणजे ४ लाख ७० हजार टन साखर शिल्लक आहे. नाशिकमधील कादवा, वसंतदादा, द्वारकाधीश, केजीएस या कारखान्यांकडे तीस हजार टन साखर शिल्लक आहे. तर नगर जिल्ह्यातील सहकारी व खासगी कारखान्यांकडे ४ लाख ४० हजार टन साखर शिल्लक आहे. दिवाळीच्या सणामुळे साखरेला मागणी असल्याने साखरविक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे यातील दीड लाख टनांपर्यंत साखरविक्री होणार आहे. नगरमधील जय श्रीराम खासगी कारखान्याने, युटेक शुगर या दोन कारखान्यांनी सर्व साखरविक्री केलेली आहे. अंबालिका कारखान्याकडे ७५ हजार टन, मुळा कारखान्याकडे ६२ हजार टन साखर शिल्लक आहे. गेल्या हंगामात जास्त ऊस असल्याने अतिरिक्त उसाचे प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे साखर उत्पादन वाढले होते. त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे साखरेची विक्री झालेली आहे. हंगाम सुरू होईपर्यंत ८० टक्के साखरेची विक्री झालेली आहे. तर यंदाही दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गाळपाला कमी ऊस उपलब्ध होईल. पावसाअभावी उसाची वाढ झालेली नसल्याने साखर उत्पादनाला फटका बसणार आहे. त्यामुळे शिल्लक साखरेचा मोठा प्रश्न कारखान्यांसमोर राहणार नाही....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kQdniwAA

📲 Get Beed News on Whatsapp 💬