[jalgaon] - ‘वर्सी महोत्सव’ उद्यापासून

  |   Jalgaonnews

सिंधी समाजात उत्साह; तयारी अंतिम टप्प्यात

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

सिंधी समाज बांधवाचे आराध्यदैवत संत कंवरराम, संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम साहेब यांच्या वर्सी महोत्सवाला शनिवार (दि. २७) पासून सुरुवात होणार आहे. अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट व पूज्य पंचायत यांच्याकडून महोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

सिंधी बांधवाच्या वर्सी महोत्सवासाठी देशभरातून हजारो भाविक जळगावी दाखल होणार आहे. संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम यांच्या समाधीला पंचामृत स्नानाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ९ वाजता विश्‍वशांतीसाठी यज्ञ होणार आहे. यासोबतच भाविकांच्या सुविधा कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता अखंड पाठ साहेब व अखंड धुनी साहेबचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर संत महात्मांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. वर्सी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. हजारो भाविक या वर्सी महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली....

फोटो - http://v.duta.us/QD_M4QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ErynDAAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬