[jalgaon] - शिवाजीनगरातील रिंगरोडचे काम सुरू होणार

  |   Jalgaonnews

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी गुरुवारी (दि. २५) पिंप्राळा व भोईटेनगर पुलाच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली. या माध्यमातून दोन्ही रिंगरोड एकमेकांना जोडले जाणार आहेत. त्यामुळे आता शहर विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या शिवाजीनगर परिसरातील रिंगरोडचे काम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने रस्ते विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. १०० कोटी रुपयांतून सहा प्रमुख रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तसेच शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यापूर्वी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गही तयार केला जात आहे. जळगाव शहराच्या विकास आराखड्यात एस. के. ऑईल मिल भागातील कानळदा रस्ता, के. सी. पार्कमार्गे ममुराबाद रस्त्यापर्यंत रिंगरोड दर्शविण्यात आला आहे. यातील काही भागाचे डांबरीकरण झाले आहे, तर उर्वरित रस्ता अजूनही कच्चा आहे. कानळदा रस्त्याच्या पुढे एका गटात भूसंपदनाचे काम बाकी आहे. पब्लिक इंटरेस्टमध्ये हे काम तातडीने मार्गी लागू शकते, अशी माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. या संपूर्ण रस्त्याची त्यांनी दुपारी पाहणी केली. भोईटेनगरमधील उड्डाणपूल मध्य रेल्वे लाईनवरील पिंप्राळा रेल्वे फाटक, रेल्वे मालधक्का, सुरत रेल्वेलाईन ओलांडून शिवाजीनगर भागात प्रस्तावित रिंगरोडसमोर उतरेल. त्यानुसार रेल्वेच्या हद्दीतील डिझाईन तयार असून, त्याला जोडणाऱ्या मनपा हद्दीतील रस्त्यांचे डिझाईन तयार करणे बाकी आहे, अशी माहितीदेखील प्रशासनाने दिली. सरकारकडून मिळणाऱ्या आणखी १०० कोटी रुपयांतून या पुलाचे काम केले जाईल. हा पूल झाल्यावर रिंगरोडचे दोन्ही भाग जोडले जाऊन वाहतुकीची सोय होणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/7DC1ywAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬