[nagpur] - ‘एमडी’च्या व्यसनासाठी चेनस्नॅचिंग

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

अत्यंत महागड्या अशा 'एमडी' नावाच्या अमलीपदार्थाचे व्यसन भागविण्यासाठी चेनस्नॅचिंग करणाऱ्या कुख्यात चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोन पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन महिन्यांत झालेले सोनसाखळी लुटीचे १० गुन्हे उघडकीस आणून चार लाख ९० हजार रुपयांचे दागिने जप्त केले. अनिल रमेश मंगलानी (वय २३, रा. खामला),असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एकूण ४३ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

एमडी हे तीन हजार रुपये प्रतिग्राम आहे. मंगलानीला एमडीचे व्यसन आहे. ते भागविण्यासाठी तो सोनसाखळी हिसकावत होता. गत दोन महिन्यांपासून उपराजधानीत पांढऱ्या रंगाच्या मोपेडस्वार लुटारूने हैदोस घातला होता. या लुटारूला अटक करण्याचे आदेश कदम यांनी दिले. सहायक पोलिस आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/auq7cQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬