[nagpur] - घर सोडून गेली अन् गजाआड झाली

  |   Nagpurnews

नागपूर : 'पुलिस के हात लंबे होते हैं' याची प्रचिती पुन्हा एकदा आली. घरफोडीच्या तपासादरम्यान शेजारी राहणारी महिला घटनेनंतर घर सोडून गेल्याचे समोर आले. बस! हाच धागा पकडून पाचपावली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन् महिला चोराला गजाआड केले. रश्मी शेखर पौनीकर (वय २५,रा.यशोधरानगर), असे अटकेतील महिला चोराचे नाव आहे. आधी ती बाळाभाऊपेठ येथील ममता अनिल बोंदाडे यांच्या शेजारी भाड्याने राहात होती. २६ ऑगस्टला ममता या राखीसाठी धरमपेठ येथील भावाकडे गेल्या. यादरम्यान चोरट्याने त्यांच्या घरातील दागिने चोरी केले. ममता घरी परतल्या. त्यांना दरवाजाचे कुलूप उघडे दिसले. कुलूप लावायचे विसरल्याचा त्यांचा समज झाला. मंगळवारी ममता यांनी आलमारी उघडली असता त्यातील मंगळसूत्र व सोन्याचे टॉप्स गायब दिसले. त्यांनी पाचपावली पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी.आर. इंगळे, हेडकॉन्स्टेबल चिंतामण डाखोळे, रविशंकर मिश्रा, सुनील वानखेडे व विजय माने यांनी घरफोडीचा तपास सुरू केला. तपासादरम्यान घरफोडी झाल्यानंतर रश्मीने बाळाभाऊपेठेतील भाड्याचे घर सोडल्याचे समोर आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले, चौकशीदरम्यान घरफोडी केल्याचे तिने मान्य केले. पोलिसांनी तिच्याकडून दागिने जप्त केले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/WrmRAQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬