[nagpur] - चोरीच्या गुन्ह्यातील वाहने जप्त; तीन आरोपींना अटक

  |   Nagpurnews

म.टा. वृत्तसेवा, चंद्रपूर

जिल्ह्यातील विविध पोलिस स्थानाकांतर्गत दाखल चोरीच्या गुन्ह्यातील एकूण १५ दुचाकी व चारचाकी वाहने हस्तगत करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दुचाकी व चारचाकी वाहनांच्या घटनेत वाढ झाली होती. वाहनचोरीच्या घटनेवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ज्या क्षेत्रात गुन्हा घडला, तेथील पोलिस निरीक्षकांना व स्थानिक गुन्हे शाखेला सूचना देऊन मोहीम सुरू केली. कारवाईच्या या मालिकेत वरोरा येथून चोरी गेलेल्या सहा दुचाकी वाहनांसह एका आरोपीला अटक करून येथील पोलिस पथकाने २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सोबतच रामनगर पोलिस, दुर्गापूर व स्थानिक गुन्हे शाखेने नऊ दुचाकी जप्त करीत दोन आरोपींना अटक केली. घडलेल्या या सर्व चोरींच्या घटनांत एकूण पाच लाख ४० हजारांचा मुद्देमाल व तीन आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई वरोरा पोलिस निरीक्षक उमेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर अंभोरे, दुर्गापूरचे यादव व रामनगरचे अशोक कोळी यांच्या पथकाने केली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/OSVIggAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬