[nagpur] - MeTooची खोटी तक्रार तरुणीच्या अंगलट

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी,

'मीटू'ची खोटी तक्रार दाखल करून सहायक पोलिस निरीक्षकाला अत्याचार प्रकरणात फसविण्याचा प्रयत्न तरुणीच्या अंगलट आला. न्यायालयाने या एपीआयला फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीविरुद्ध फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश हुडकेश्वर पोलिसांना दिले.

एपीआय राजेंद्र मगदुम २०११मध्ये इमामवाडा पोलिस स्टेशनमध्ये तैनात होते. याप्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे होती. यामध्ये करिना (नाव बदलले) आरोपी होती. तपास सुरू असतानाच करिना ही तिचे घर विकत असल्याची माहिती मगदुम यांना मिळाली. मगदुम यांना घर हवे होते. २०१४मध्ये त्यांनी करिनासोबत २० लाखांमध्ये घरखरेदीचा व्यवहार केला. पाच लाख रुपये रोख देऊन, १५ लाखांचे बँकेतून कर्ज घेतले. पैसे घेतल्यानंतर करिनाने घर विक्री करण्यास नकार दिला. तिने अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी मगदुम यांना दिली. मगदुम यांनी करिनाविरुद्ध हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. हुडकेश्वर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवर कारवाई केली नाही. मगदुम यांनी अॅड. समीर सोनवणे यांच्या माध्यमातून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी शहजाज परवेज यांच्या न्यायालयात धाव घेतली. करिनाने दिलेल्या धमकीचे रेकॉर्डिंग न्यायालयात सादर केले. करिनाविरुद्ध सबळ पुरावे असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी अॅड. सोनवणे यांनी न्यायालयाला केली. सबळ पुराव्याच्या आधारे मागणी मंजूर करीत न्यायालयाने हुडकेश्वर पोलिसांना करिनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. वृत्त लिहिपर्यंत करिनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता.

फोटो - http://v.duta.us/A8XtzAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ditm7QAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬