[nashik] - पाणी सोडण्याची घाई, विसरले सही!

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून नाशिक आणि अहमदनगरच्या धरणांमधून चालवलेली पाणी सोडण्याची घाई महामंडळाच्या चांगलीच अंगलट आली आहे. महामंडळाचे कार्यकारी संचालक अ. प्र. कोहिरकर यांची स्वाक्षरीच नसलेला आदेश नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्तांनी महामंडळाच्या संचालकांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. सोबतच नव्याने सही असलेला आदेश आणायचे फर्मावल्याचीही चर्चा आहे.

नाशिक आणि नगरच्या धरणांमधून ३१ ऑक्टोबरपूर्वी ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने काढले आहेत. संबंधित आदेश नाशिक, नगर आणि औरंगाबदमधील सरकारी यंत्रणांना पाठविण्यात आला आहे. परंतु, या पाणी सोडण्याच्या विरोधात नगर आणि नाशिकमध्ये तीव्र आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे महामंडळाकडून महसूल यंत्रणेवर पाणी सोडण्यासाठी दबाव वाढविण्यात आला असून, त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाच्या संचालकांनी गुरुवारी नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांना घाई गडबडीत एक आदेश पाठवला. या आदेशात ३१ ऑक्टोबरपूर्वी नाशिक आणि नगरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असे म्हटले आहे. पाणी सोडताना त्यात अडथळे येऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. सर्व पाटबंधारे यंत्रणेस आदेशित करून पाण्याचा अवरोध करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे. परंतु, पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अ. ह. कोहिरकर यांचा आदेश असला, तरी या आदेशावर कोहिरकर यांची स्वाक्षरी नसल्याचे समोर आले आहे. ई मेलद्वारे आलेल्या या आदेशात कोहिरकर यांची स्वाक्षरी नसल्याचे माने यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदरील आदेशावरच शंका उपस्थित केली. पाटबंधारे विभागाचे अधिकारी घाईत प्रोटोकॉल विसरल्याचे लक्षात आल्यानंतर माने यांनी या आदेशावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. पाणी सोडण्याची एवढी घाई कशाला, असा सवाल त्यांनी यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केला असून, प्रोटोकॉल तोडल्याबद्दल जाब विचारला आहे. सदरील आदेश नव्याने सहीसह पाठविण्याचे निर्देश त्यांनी महामंडळाचा दिल्याची चर्चा महसूल आणि पोलिस यंत्रणेत आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/QvFXVAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬