[nashik] - शासनआदेश पायदळी!

  |   Nashiknews

गैरव्यवहारातील संशयित अधिकाऱ्याची संचालकपदी वर्णी

Tweet : vijaymahaleMT

नाशिक : विभागीय चौकशी सुरू असलेल्या आणि या चौकशीवर प्रभाव टाकण्याचा वा चौकशीस अडथळा आणण्याची शक्यता असलेल्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे अतिरिक्त पदभार देऊ नये, असे स्पष्ट शासन निर्देश आहेत. मात्र, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त पदभार सुपूर्द करताना राज्य सरकारने आपलाच आदेश पायदळी तुडवला आहे.

शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार सोपविताना सामान्य प्रशासनाचे कोणतेही धोरण किंवा आदेश नव्हते. त्यामुळे अनेकदा योग्य, सेवाज्येष्ठता असलेल्या अधिकाऱ्यांना डावलून अन्य व्यक्तींना मोठ्या पदाची जबाबदारी सोपविली जात होती. यामुळे प्रशासनास अपेक्षित लाभदेखील मिळत नव्हता. नेमक्या याच बाबीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने ५ सप्टेंबर २०१८ रोजी शासनआदेश जारी करीत काही मार्गदर्शक सूचना केल्या. त्यानुसार रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार त्याच संबंधित विभागातील सेवाज्येष्ठता असलेल्या अनुभवी आणि कार्यक्षम अधिकाऱ्याकडेच सोपविण्यात यावा. जर ज्येष्ठ व्यक्तीला डावलून अन्य व्यक्तीकडे अतिरिक्त कार्यभार द्यायचा असेल तर सर्वांत ज्येष्ठ व्यक्ती अतिरिक्त कार्यभारासाठी का अपात्र आहे, त्याची लेखी कारणे द्यावीत. तसेच कमी अनुभव असलेली व्यक्ती संबंधित पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडू शकेल याची प्रशासनाने खातरजमा करून घ्यावी, अशा स्पष्ट सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोपविताना साफ दुर्लक्ष करण्यात आलेले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5BSgsAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬