[pune] - आगीमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

झोपडपट्टीत लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला, तर सात जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. दळवीनगर चिंचवड येथे गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली.

संजय क्षीरसागर (३५), प्रदीप मोटे (३२) होरपळून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दळवीनगर झोपडपट्टीमधील एका घराला पहाटे अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अरुंद रस्त्यामुळे शेजारील सोसायटीच्या इमारतीच्या कंपाउंड वॉलपर्यंत बंब आणून पाणी मारले जात होते. या वेळी दोन गॅस सिलिंडर फुटल्याने आग भडकली. आगीमध्ये क्षीरसागर, मोटे, राजुबाई जाधव, शंकर पांचार, हरी मनोहर, रवी वाघमारे, सुंदर तरस यांची घरे जळून गेली आहेत. क्षीरसागर आणि मोटे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. क्षीरसागर यांच्या घरात यल्लम्मा देवीचे मंदिर आहे. आगीमध्ये सर्व जळून गेल्याने ऐनदिवाळीच्या तोंडावर आता करायचे काय असा मोठा प्रश्न या सर्वांसमोर उभा ठाकला आहे. येथील बहुतांश लोकांच्या घरात प्लास्टिकची भांडी होती. आगीमध्ये ही भांडी आणि यामध्ये साठविलेले गृहपयोगी साहित्य, धान्य, कपडे, पैसे जळून खाक झाले आहेत. या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लोकांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-yUQhAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬