[pune] - आरोग्य निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षकाने ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिकाऱ्याकडे वेळोवेळी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप संबंधित महिला अधिकाऱ्याने केला आहे. महिला अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, बंडगार्डन पोलिस ठाण्यात मुख्य आरोग्य निरीक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब साबळे असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. फिर्यादी महिला जून २०१८ पासून महापालिकेच्या एका क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहेत. जून २०१८ ते २४ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत साबळे यांनी संबंधित महिलेला वारंवार फोन करून व प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यानंतर तिला त्रास दिला. त्यानंतर महिलेने पतीसह पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/egjqTwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬