[pune] - एकाला सक्तमजुरी

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

नीलेश किसन निकत (वय २८, रा. जनता वसाहत, पर्वती) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी १४ वर्षीय पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. नऊ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी पाच ते साडेसात या कालावधीत दत्तवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.

पीडित विशेष मुलगी आहे. ती सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्या वेळी आरोपी शौचालयात गेला. दरवाजाला आतून कडी लावून तिच्याशी अश्‍लील चाळे करू लागला. त्या वेळी ती ओरडली. तिथे असलेल्या महिला धावत गेल्यामुळे तो पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात दत्तवाडी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी आरोपीला कोर्टाने शिक्षा सुनावली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GQTrJwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬