[pune] - काँग्रेसच्याची सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने

  |   Punenews

पिंपरी:

केंद्र सरकर ‘सीबीआय’च्या कामकाजात हस्तक्षेप करत दबाव वापरत असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आकुर्डीतील सीबीआय-एसीबी च्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

देशभरातील ‘सीबीआय’च्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने आज निदर्शने करण्यात येत आहेत. आकुर्डीतील सीबीआय-एसीबीच्या (१० जिल्हे कार्यक्षेत्र) कार्यालयासमोर युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहराध्यक्ष सचिन साठे, महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सरचिटणीस सजी वर्की, मयूर जयस्वाल, माजी महिला प्रदेशध्यक्षा श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, प्रवक्ते गौरव चौधरी, शहाबुद्दीन शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सत्यजित तांबे म्हणाले, 'सीबीआयचे संचालक आलोक वर्मा राफेलमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करणार होते. त्यामुळे आपली चोरी उघड होईल याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भीती होती. त्यामुळे त्यांनी अधिकार नसताना मध्यरात्री वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. सीबीआय, रॉ, आयबीआय अशा संस्था संपविण्याचे काम मोदी सरकार करत आहे. सीबीआयच्या संचालकाला काढायचे असेल तर न्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते निर्णय घेत असतात. परंतु, मोदी यांनी कोणालाही विश्वाससात न घेता हुकूमशाही पध्दतीने वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. कायदा पायदळी तुडविण्यात आला आहे' असेही तांबे म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/L_N2rgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/I6Fk3AAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬