[pune] - डॉ. यशवंत मनोहर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार

  |   Punenews

पुणे:

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदाचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना प्रदान करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ रोजी माजी केंद्रिय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्य हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहूणे म्हणून विखे-पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे-पाटील उपस्थित राहणार आहेत, असे महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, मुख्य मानद सल्लागार महेंद्र रोकडे, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रविंद्र डोमाळे यांनी कळविले आहे....

फोटो - http://v.duta.us/qxTTlQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Qn7KTwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬