[pune] - पाणीकपात रद्द करा;अन्यथा आंदोलन

  |   Punenews

काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा महापौरांना इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सणासुदीच्या काळात पुणेकरांवर लादलेली पाणीकपात अन्यायकारक आहे. कोणतीही पाणीकपात होणार नाही, असे सांगणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांची फसवणूक केली आहे,' अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली. दिवाळीच्या काळात केली जाणारी कपात रद्द करावी, अन्यथा दिवाळीच्या दिवशी पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर हंडामोर्चा काढण्यात येइल, असा इशाराही जोशी यांनी दिला आहे.

शहरात केल्या जाणाऱ्या पाणी कपातीबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेतली. यावेळी महापौरांना टँकरची प्रतिकृती भेट देण्यात आली. काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरु, रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शहरात सोमवारपासून पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे वेळापत्रकही पालिकेने जाहीर केले आहे. ऐन दिवाळीच्या काळात पाणीकपात केल्यास नागरिकांचे हाल होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या डाव्या मुठा कालव्यामध्ये शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येत नाही. तसेच, धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे दिवाळीनंतर कपात करावी, अशी विनंती जोशी यांनी केली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2yZwjwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬