[pune] - पुणे: केशकर्तन, दाढीचे दर महागले

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी,

इंधनासह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरात दिवसागणिक वाढ होत असतानाच आता केशकर्तन व दाढी करण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुणे शहराच्या विशेष सर्वसाधारण सभेत कटिंग व दाढीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कटिंग करण्यासाठी १०० रुपये, तर दाढी करण्यासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून ही दरवाढ अंमलात येणार आहे. सध्या नागरिकांकडून केशकर्तनासाठी ८० रुपये व दाढी करण्यासाठी ४० रुपये सर्वसाधारणपणे आकारले जातात. गेल्या दोन वर्षांपासून हे दर वाढविण्यात आले नव्हते. मात्र, दैनंदिन महागाईसह सलूनला लागणारे कॉस्मेटिक्स, इतर वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढल्याने नाभिकांना वाढत्या खर्चाला तोंड देणे मुश्किल झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाभिक महामंडळाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष चंद्रशेखर जगताप यांनी दिली. या वेळी महामंडळाचे सदस्य नानासाहेब आढाव, कृष्णकांत जगताप, बाळासाहेब राऊत आदी उपस्थित होते.

फोटो - http://v.duta.us/dpkuiAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/JJV7YAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬