[pune] - प्राध्यापकांना कामावरघेण्याचे कोर्टाचे आदेश

  |   Punenews

'सिंहगड' विरोधात प्राध्यापक, पोलिस एकत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई उच्च न्यायालयाने सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या विविध कॉलेजांमधून कमी करण्यात आलेल्या ९६ प्राध्यापकांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. संस्थेने कोणतेही कारण नसताना प्राध्यापकांना कामावरून कमी केले होते, अशी माहिती सिंहगड समन्वय समितीतर्फे देण्यात आली.

थकित वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या प्राध्यापकांना संस्थेने कोणतेही कारण नसताना कामावरून कमी केले. या प्राध्यापकांमध्ये कॉलेजमध्ये पूर्णवेळ 'पे रोल'वर काम करणारे प्राध्यापक होते. सोसायटीच्या या निर्णयाविरोधात प्राध्यापकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीत सोसायटीला कामावरून कमी केलेल्या प्राध्यापकांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक प्रा. सचिन शिंदे यांनी दिली. आता उर्वरित २३८ प्राध्यापकांचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजेच त्यांना पुन्हा कामावर घेण्याबाबत प्राध्यापकांनी नवे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करावे, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/dUbe3wAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬