[pune] - पोलिस उचलणार कामाचा अधिक भार

  |   Punenews

मनुष्यबळाअभावी वाढता व्याप आवरण्यासाठी आयुक्तांचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर विविध शाखा आणि विभाग सुरू करण्यात आले आहेत. परंतु मनुष्यबळाची कमतरतेमुळे वाढता कामाचा व्याप आवरण्यासाठी एक पोलिस एकावेळी अनेक कामे करणार आहे,' अशी माहिती पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय वाहतूक विभाग नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. उद्घाटनासाठी उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त नम्रता पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त म्हणाले, 'नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्तालयांतर्गत फिरती तक्रार पेटी ठेवण्यात येत आहे. एखाद्या ठिकाणी ती पेटी साधारणतः दोन दिवस ठेवण्यात येईल. त्यानंतर ती पेटी पोलिस ठाण्यात आणून उघडण्यात येईल. त्यातील तक्रारींवर तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल. या पेटीमध्ये तक्रार टाकताना निनावी तक्रार दिली तरी चालणार आहे. निनावी तक्रारींची देखील पोलिसांकडून दखल घेण्यात येईल. एखादा पोलिस तपासासाठी बाहेर पडला तर तो संबंधित सोसायटी, शाळा-महाविद्यालयात जाऊन तक्रार पेटी घेऊन येईल. त्याच वेळी त्या भागातील आरोपीला समन्स बजावेल. यामुळे पोलिसांचा वेळ वाचेल. तो वेळ अन्य कामांसाठी वापरता येईल.'...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/j6dNJgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬