[pune] - मुंबई पोलीस असल्याचं सांगून खंडणीचा फोन

  |   Punenews

पुणे:

मुंबई येथील गुन्हे शाखेचा अधिकारी बोलत असल्याचं सांगून जंगली महाराज रोडवरील एका हॉटेल व्यवसायिकाकडे दहा लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल वामन भिडे (रा. शिवाजीनगर) यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिडे यांचा हॉटेलिंगचा व्यवसाय आहे. त्यांना २४ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीनं मुंबई क्राइम ब्रॅंचमधून इन्स्पेक्टर शिंदे बोलत असल्याचं सांगितलं. त्यांना एका गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडं दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भिडे यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणी विरोधीत पथकाकडून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

फोटो - http://v.duta.us/RWK3YAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_6corQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬