[pune] - लिफ्ट मागणाऱ्या जवानाला लुटले

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लिफ्ट मागणाऱ्या भारतीय नौदलातील सैनिकाला चाकूचा धाक दाखवून चार जणांनी लुटले. सैनिकाकडील ३० हजार ७०० रुपयांचा ऐवज काढून घेतला. बुधवारी (२४ ऑक्टोबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास देहूरोड-कात्रज महामार्गावर वाकडमधील ताज हॉटेलसमोर ही घटना घडली.

विनायक शंकर पागावार (वय ४४, रा. उरण, जि. रायगड) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक बुधवारी मध्यरात्री वाकडमधील हॉटेल ताजसमोर बायपास रोडवर लिफ्ट मागत होते. बराच वेळ कोणतेही वाहन थांबले नाही. काही वेळेनंतर दोन दुचाकी त्यांच्या जवळ आल्या. त्यावर चारजण बसले होते. चौघांनी जवळ येताच विनायक यांना चाकूचा धाक दाखवला. या वेळी दोघांच्या तोंडाला रुमाल बांधले होते. त्यांनी विनायक यांच्याजवळ असलेले ३० हजार रुपये रोख आणि एक टॅब असा एकूण ३० हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटला. पोलिस सहायक निरीक्षक गणेश धामणे तपास करीत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/9uXY-QAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬