[solapur] - शरद बनसोडे बेवडा खासदारः प्रणिती शिंदे

  |   Solapurnews

सूर्यकांत आसबे, सोलापूर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाजवळ येऊ लागल्या आहेत तशी राजकीय मंडळी एकमेकांवर खालच्या थरावर येऊन भाषा वापरत आहेत. सोलापुरातील मौलाली चौकात रस्ते कामाच्या उदघाटन कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे यांची जीभ घसरली. दोन देशमुखांची भांडणे सोलापूरकर पाहत आहेत, असे सांगत प्रणिती शिंदे यांनी खासदार शरद बनसोडे यांच्यावर 'बेवडा खासदार' अशा शब्दात टीका केली. प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काँग्रेसच्या काळातील रस्ते आणि ड्रेनेजची कामं सुशीलकुमार शिंदे यांनी मंजूर केली. त्या कामांचं उदघाटन भाजपचे मंत्री करत आहेत. दोन देशमुख मंत्र्यांच्या भांडणामुळे सोलापूरचा विकास खुंटला. दोन मंत्री आणि एक बेवडा खासदार, असा उल्लेख प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात करून खालच्या थराला जाऊन टीका केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत....

फोटो - http://v.duta.us/BTZyAQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/YNYrbgAA

📲 Get Solapur News on Whatsapp 💬