[thane] - रिक्षाभाडेवाढीला आरटीओचे समर्थन!

  |   Thanenews

बदलापूर : बदलापुरात रिक्षाचालकांनी प्रत्येक प्रवाशामागे २५ ऑक्टोबरपासून पाच रुपये भाडेवाढ केली. मात्र ही भाडेवाढ नियमात असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाडेवाढीनंतर रिक्षात तीन ऐवजी पाच प्रवासी बसवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

या आधी बदलापूर रेल्वे स्थानक ते बदलापूर गाव या साडे तीनकिलो मीटरच्या मार्गावर १० रुपये भाडे होते. मात्र प्रवाशामागे रिक्षा संघटनेने पाच रुपये वाढवले आहे. या भाडेवाढीबाबत आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, मीटरनुसार या मार्गावर १९ रुपये भाडे होते. त्यामुळे १५ रुपये भाडे मीटरच्या नियमात असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र नियमानुसार आणि मीटरच्या अंतरानुसार जर प्रत्येक प्रवाशाकडून १५ रुपये भाडे घेतले जात असेल तर रिक्षाचालकांनीही प्रत्येक रिक्षात तीनच प्रवासी बसवणे अपेक्षित आहे. मात्र रिक्षाचालक पाच प्रवाशांची वाहतूक एका वेळेस करतात. या चालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/M51RWAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬